Monday, 21 January 2013

जनन शांती

                                                                  *जनन  शांती *
तिथी , नक्षत्र , योग, करण
तिथी :- कृष्ण चतुर्दशी , अमावस्या, क्षय तिथी 

नक्षत्र :-१. अश्विनी नक्षत्राच्या पहिले ४८ मिनिटावर जन्म झाल्यास शांती करावी .
             २. पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणावर शांती करावी. (गो प्रदान करावे.)
             .आश्लेषा नक्षत्राच्या कुठल्याही चरणावर(आश्लेषा नक्षत्र पूर्ण )  जन्म झाल्यास शांती करावी
             धर्मसिंधुनुसार आश्लेशाच्या द्वितीय चरणावर जन्म झाल्यास धननाश,तृतीय चरणावर जन्म
             झाल्यास मातृअरिष्ट ,चतुर्थ चरणावर जन्म झाल्यास पितृअरिष्ट  . तसेच सासू सासरे यांसं अरिष्ट
             ४.  मघा नक्षत्राच्या पहिल्या चरणावर जन्म झाल्यास शांती करावी .
             ५.उत्तरा नक्षत्राच्या पहिल्या जन्म झाल्यास शांती करावी .
             ६. चित्रा नक्षत्राच्या पुर्वाधावर  जन्म झाल्यास शांती करावी व आज दान करावे .
             ७.विशाखा नक्षत्राच्या चतुर्थ चरणावर जन्म झाल्यास फक्त ग्रहमख करावे . शांती नाही .
             ८. ज्येष्ठा नक्षत्रावर जन्म झाल्यास शांती करावी. कन्या जन्म झाल्यास दिरास अरिष्ट असते.
             ९. मूळ नक्षत्रावर जन्म  झाल्यास शांती करावी.मूळ नक्षत्रावर प्रथम चरणावर  पुत्र जन्म झाल्यास
                 पित्यास अरिष्ट असते.तृतीत चरणावर असता धननाश व चतुर्थ चरणी असता कुळास अरिष्ट
                 असते.तसेच प्रथम चरणावर पुत्रीचा जन्म झाल्यास सासऱ्यास अरिष्ट,द्वितीय चरण असता
                सासूस अरिष्ट,तृतीय चरणावर असता धननाश ,व चतुर्थ चरणावर असता कुळास अरिष्ट असते.
           १०. पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्म झाल्यास शांती करावी व सुवर्ण दान करावे.
           ११. रेवती नक्षत्राच्या शेवटच्या ४८ मिनिटावर जन्म झाल्यास शांती करावी.
           १२.इतर सर्व नक्षत्रांच्या शांती नाहीत.


           * वैधृती, व्यतिपात करण यावर जन्म असता तसेच विष्टी (भद्रा )असता शांती करावी.
           * यमल (जुळ्यांचा जन्म असल्यास ) यमल शांती करावी.
           * सदंत (जन्मतः दात असल्यास) सदंत शांती करावी.
           *  माता , पिता , भाऊ , बहिण ,यांच्या पैकी एकाच्या जन्म नक्षत्रावर जन्म झाल्यास शांती करावी.
           *  तीन मुलानंतर मुलगी  किंवा तीन मुलीनंतर मुलगा असल्यास शांती करावी.
           * सूर्य संक्रमण पर्व काळात जन्म झाल्यास  शांती करावी.
           * दग्ध व यमघंट  यावर जन्म झाल्यास शांती करावी.
           *  कृष्ण चतुर्दशीस जन्म असल्यास शांती करावी .
            * अमावस्यास जन्म असल्यास शांती करावी .
         


               शांती करण्यासाठी कालावधी :- जन्म झाल्यावर १२ व्या किंवा शुभ दिवशी शांती करावी. १२व्या दिवशी शांती करावयाची असल्यास नक्षत्र किंवा अग्निवास  बगण्याची आवश्यकता  नाही.इतर वेळेस करावयाची असल्यास नक्षत्र शुद्धी अग्निवास बघणे आवश्यक आहे .
उत्तरा, रोहिणी , श्रवण, धनिष्टा, शततारका ,पुनर्वसु, स्वाती, माघा, अश्विनी , हस्त, पुष्य, अनुराधा, रेवती हि नक्षत्र असता दिवसं शुभ मानवा.

                     वरील सर्व शांती ब्राम्णाकडून( वैदिक) विधिवत करून घेतल्यास अरिष्ट टळते.

3 comments:

  1. माझ्या मुलीला जन्मत: दात होता त्यासाठी कोणती शांतीक करावी कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  2. माझ्या मुलीला जन्मत: दात होता त्यासाठी कोणती शांतीक करावी कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete